कार्यकर्त्याच्या निनावी पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप!

कार्यकर्त्याच्या निनावी पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं शरद पवार यांनापक्षातील वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहिलं आहे. या निनावी पत्रामुळे पक्षात भूकंप आला आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये आमदार, खासदार, प्रवक्ता, शहर अध्यक्ष, वेगवेगळ्या सेलची प्रमुख पद ही केवळ मराठा समाजाला देण्यात येत आहेत,’ असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असून मी मांडत असलेली भावना पक्षातील असंख्य लोकांच्या मनात असल्याचंही या कार्यकर्त्यानं पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान एकीकडे शरद पवार नेहमी पक्षात सर्व जातीच्या लोकांना स्थान द्या असं म्हणतात. पण दुसरीकडे ही विसंगती समोर येत असल्याने पक्ष एकाच जातीच्या अधिपत्याखाली चालावी अशी पक्षनेतृत्वाची इच्छा आहे की काय,’ असा प्रश्नही या पत्रात उपस्थित केला जात आहे. तसेच वंदना चव्हान यांच्या कामामुळे एनजीओ बळकट झाल्या आहेत आणि पक्षसंघटना खिळखिळी झाली आहे. चेतन तुपे यांच्या पार्ट टाईम काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाच्या स्थापनेपासूनच ही सर्वात अयशस्वी कारकीर्द ठरणार आहे. नेत्यांना फसवून तुम्ही यशस्वी व्हाल पण पक्षाचे वाटोळे होणार आहे,’ असा गंभीर आरोपही या कार्यकर्त्यानं केला आहे.

COMMENTS