वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस’ राष्ट्रवादीची सरकारविरोधात बॅनरबाजी !

वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस’ राष्ट्रवादीची सरकारविरोधात बॅनरबाजी !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भाजप सरकारविरोधात बॅनरबाजी केली आहे. वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस’ असा मजकूर छापून राष्ट्रवादीनं सरकावर हल्लाबोल केला आहे. पुण्यातील दांडेकर पूल येथील कालवा फुटी प्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे ही घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यावर पुण्यात स्वारगेट येथील जेधे चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

 

‘उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे पुण्याचा कालवा फुटला, वेड्याचा बाजार, पेढ्यांचा पाऊस’ असा मजकूर असलेला फ्लेक्स राष्ट्रवादीने लावला आहे. पुण्यातील दांडेकर पूल येथील खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा फुटल्याने ४०० हून अधिक घरांचे नुकसान झाले. यानंतर घटनास्थळी राजकीय क्षेत्रातील मंडळींनी भेटी देऊन पीडित नागरिकांशी संवाद साधत मदतीची आश्वासने दिली.त्यानंतर शुक्रवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही येथील परिस्थीतीचा आढावा घेऊन उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचं म्हटलं. महाजनांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीनं जोरदार टीका केली आहे.

 

COMMENTS