कांद्याच्या वाढत्या दराबाबत केंद्रीय अर्थमंत्र्याचं अजब स्पष्टीकरण !

कांद्याच्या वाढत्या दराबाबत केंद्रीय अर्थमंत्र्याचं अजब स्पष्टीकरण !

नवी दिल्ली – देशभरात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या किंमतीनं शंभरी गाठल्यामुळे सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. याबाबत ससंदेच्या सुरू असलेल्या सत्रात पुन्हा एकदा कांद्याच्या दरवाढीवर चर्चा करण्यात आली. संसदेत चर्चेदरम्यान कांद्याच्या वाढत्या दराबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सवाल करण्यात आला. यावर निर्मला सीतारमन यांनी आपले कुटुंबीय कांदा, लसूणसारखे पदार्थ जास्त खात नसल्याचं अजब स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांकडून टीका केली जात आहे.

दरम्यान मी जास्त कांदा, लसूण खात नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जात नसल्याचं सितारामन यांनी म्हटलं आहे. तसेच कांदा दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती पावलं उचचली जात आहेत. कांद्याच्या साठवणुकीसंदर्भात काही मुद्दे आहेत आणि सरकार त्याला सामोरे जाण्यासाठी काही पावलं उचलत आहे. कांद्याच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. परंतु उत्पादन वाढीला प्रोत्साहित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सीतारमन म्हणाल्या आहेत.

COMMENTS