नितीन गडकरींना मंचावरच आली भोवळ, प्रकृती स्थिर !

नितीन गडकरींना मंचावरच आली भोवळ, प्रकृती स्थिर !

अहमदनगर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अहमदनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान मंचावरच भोवळ आली असल्याची घटना घडली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून मंचावर उपस्थित असलेल्या राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले.  डॉक्टरांकडून गडकरींची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली.नितीन गडकरी हे हेलिकॉप्टरने शिर्डीत आले होते. तिथून ते राहुरीतील कार्यक्रमात गेले. तिथे जवळपास अर्धा तास नितीन गडकरी यांनी भाषण केले होते. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांना भोवळ आली. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना भोवळ आली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितीन गडकरी यांना मधुमेहाचा त्रास असून डॉक्टरांनी त्यांना यापूर्वीही विश्रांतीचा सल्ला दिला होता. नितीन गडकरी हे सध्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये आहेत.

 

COMMENTS