…त्याची मंत्री म्हणून मला लाज वाटते – नितीन गडकरी

…त्याची मंत्री म्हणून मला लाज वाटते – नितीन गडकरी

मुंबईमुंबई – गोवा महामार्गाचं काम गेली काही दिवसांपासून रखडलं आहे.त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ‘रखडलेल्या चौपदरीकरणामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत, त्याची मंत्री म्हणून मला लाज वाटत असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच हे पाप काँग्रेस आघाडी सरकारचं असून आता नव्याने कंत्राटदार नेमला आहे. तसेच मार्च 2019 पर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करणार असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबईतील पर्यटनवृद्धीसाठी आणलेली ‘अ‍ॅम्पीबियस’ बसबाबातही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान मुंबई आणि दिल्लीमधील अंतर आणखी कमी करुन व्यापाराला चालना देण्यासाठी मुंबई दिल्ली हा नवीन एक्सप्रेस वे निर्माण करणार असल्याची घोषणा देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच या एक्सप्रेस वेची निर्मिती करण्यासाठी तब्बल १ लाख कोटी रुपये खर्च येणार असून अडीच ते तीन वर्षात याच काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचंही ते म्हणाले आहेत.

 

COMMENTS