सभेदरम्यान नितीन गडकरींना आली भोवळ !

सभेदरम्यान नितीन गडकरींना आली भोवळ !

अहमदनगर – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्टेजवरच भोवळ आली आहे. शिर्डीतील सभेदरम्यान त्यांना भोवळ आली असून ते बोलत असतानाच त्यांना भोवळ आली आणि ते खाली बसले. सध्या गडकरी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान नितीन गडकरी यांना ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास आहे. याआधी डिसेंबर महिन्यात राहुरीमध्येही त्यांना चक्कर आली होती. त्यावेळीही त्यांच्या रक्तातली साखर कमी झाली होती. याच उष्णतेचा त्रास नितीन गडकरी यांना झाला आणि ते अचानक खाली बसले.
दरम्यान शेवटच्या म्हणजेच चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडणार आहे. आज पाच वाजल्यापासून  प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. प्रचारसभेसाठीच नितीन गडकरी आज शिर्डीत गेले होते.

COMMENTS