राज्य सरकार बैलासारखे-नितीन गडकरी

राज्य सरकार बैलासारखे-नितीन गडकरी

नागपूर – राज्यातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखे आहे. या सरकारला तुतारी घेऊन सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच जात नाही, अशी टीका केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ रविवारी नागपुरात पूर्व विदर्भाच्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. मात्र राज्यात सरकार बदलले आणि काम ठप्प झाले. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी एक वर्ष या सरकारला लागले. भाजपचे सरकार असते तर एक महिन्यात झाले असते. राज्यातील आघाडी सरकार व केंद्रातील विरोधक जातीचे राजकारण करीत आहेत. त्यांना धडा शिकवायला हवा, असेही गडकरी म्हणाले.

फडणवीस म्हणाले, विश्वासघात करत राज्यात तीन पक्षांचे सरकार आले. पण आज सरकारमधील एकही मंत्री वर्षांतील आपले काम सांगू शकले नाही. शेतकऱ्यांना दिलेले वचन लक्षात नाही. मात्र मुख्यमंत्रिपदाचे वचन त्यांच्या बरोबर लक्षात आहे. हे सरकार आहे की तमाशा? ओबीसी मुलांना जगात चांगल्या ठिकाणी शिकता यावे यासाठी योजना आणली, मात्र हे सरकार काय करतेय माहीत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले. मात्र या सरकारमधील मंत्री वेगवेगळ्या भूमिका मांडून नवे वाद निर्माण करतात.

 

COMMENTS