विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढच्या अधिवेशनात

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढच्या अधिवेशनात

मुंबई – नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोण बसणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लावली तर त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात न घेता पुढच्या अधिवेशनात घेतली जाणार आहे, असल्याचे समजते.

विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा दहा दिवस होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव तसंच लक्षवेधी होणार नाही. निवडणूक अधिवेशनात होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाल असून उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचे कामकाज चालवले जाणार आहे.

COMMENTS