प्रेयसीमुळे गेले चक्क मंत्रीपद !

प्रेयसीमुळे गेले चक्क मंत्रीपद !

विविध कारणांमुळे मंत्रीपदं गमावावी लागल्याची आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे, मंत्रालयात एखादी मोठी आणि चुकीची गोष्ट झाल्यामुळे किंवा इतर गोष्टीमुळे अऩेकांनी मंत्रीपदे गमावली आहेत. मात्र नार्वेच्या एका मंत्र्याला चक्क त्याच्या प्रेयसीमुळे मंत्रीपद गमवावं लागलं. पेर सँडबर्ग असं त्या मंत्र्याचं नाव आहे. सँडबर्ग हे 58 वर्षांचे आहेत. ते त्यांची प्रेयसी बाहारेह लेटन हिच्यासोबत फिरायला गेले होते. लेटन ही 28 वर्षाची सौंदर्यवती आहे. हे जोडपं इराणध्ये फिरायला गेलं होतं. तेही त्यांच्या पंतप्रधानांना न सांगता. त्यामुळे त्यांना मंत्रीपद गमवावं लागलं आहे.

त्याचं झालं असं. नार्वे आणि इराण यांच्यात फारसे चांगले संबध नाहीत. इराणमध्ये नार्वेची हेरगिरी होते असा नार्वेतील नागरिकांचा ठाम संशय आहे. त्यामुळे मंत्रीमहोदय इराणागेल्यामुळे नार्वेच्या राजकारणात मोठं वादळ निर्माण झालं. बरं मंत्रीमहोदयांनी फिरायला जाताना पंप्रधानांनाही कळवलं नाही. त्यामुळे संशय अधिकचाच वाढला. विरोधकांनी याच्यावर रान उठवले. हा प्रकार हेरगिरीचा असल्याचा त्यांचा आरोप आहे. देशभर या प्रकरामुळे संताप व्यक्त झाल्यामुळे अखेर पेर सँडबर्ग यांना त्यांच्या पशूसंवर्धन खात्याचा राजीनामा द्यावा लागला.

COMMENTS