भाजपला धक्का, आणखी एक पक्ष एनडीएतून बाहेर पडणार ?

भाजपला धक्का, आणखी एक पक्ष एनडीएतून बाहेर पडणार ?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला असून आणखी एका पक्षानं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी आम्ही लवकरच एनडीएतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं आहे. एनडीएतून बाहेर पडण्याच्या योग्य वेळेची आम्ही वाटत पाहत आहोत, असे संगमा यांनी म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना हा मोठा धक्का असल्याचं मोनलं जात आहे.

दरम्यान नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून संगमा आणि मोदी सरकारमध्ये वाद आहे. जर केंद्र सरकारनं हे विधेयक राज्यसभेत आणलं तर आम्ही तत्काळ एनडीएतून बाहेर पडू असं त्यांनी म्हटलं आहे. एनपीपीच्या पाठिंब्यावरच मणिपूर आणि अरुणाचलमध्ये भाजपचे सरकार आहे. तर मेघालयमध्ये एनपीपीच्या सरकारला भाजपचा पाठिंबा आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजप सरकारला मोठा धक्का बसणार आहे.

संगमा यांनी पूर्वोत्तर राज्यांतील दुसऱ्या पक्षांनाही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याचे अपिल केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक असे आहे की, ज्याने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या सहा अल्पसंख्याक समाजांच्या मुस्लिम लोकांना सर्व अडचणी संपवून भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. आम्ही दुसऱ्या पक्षांबरोबर मिळून नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करू, कारण या विधेयकामुळे लोकसंख्या नियंत्रण कायद्यात मोठा बदल होणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे राज्यसभेत मंजूर होऊ नये, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही संगमा यांनी म्हटलं आहे.

COMMENTS