भाजपला मोठा धक्का, ‘हा’ मित्र पक्ष एनडीएतून बाहेर पडणार ?

भाजपला मोठा धक्का, ‘हा’ मित्र पक्ष एनडीएतून बाहेर पडणार ?

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत मोठ यश मिळाल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण बिहारमधील भाजपचा मित्र पक्ष असलेला जेडीयु एनडीएतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. लोकसभेच्या निकालानंतर जेडीयुला एका मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. पण, जेडीयुनं ऑफर नाकारत एनडीएसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. परंतु काही घटनांचा विचार करता नितीश कुमार योग्य वेळेची वाट पाहत असल्याची चर्चा असून ते लवकरच भाजप सोडतील अशी चर्चा आहे.

दरम्यान पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर ममता बॅनर्जींच्या तृणमुल काँग्रेससाठी रणनीती आखणार आहेत. त्याकरता त्यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली आहे. या सर्व घडामोडी नितीश कुमार यांच्या परवानगीनं होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपचा कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जींच्या प्रचारकरता प्रशांत किशोर यांना नीतीश कुमार यांनी परवानगी दिली का? जर दिली असेल तर जेडीयू एनडीए सोडणार का? याबाबत चर्चा सुरु आहे.

COMMENTS