विरोधी पक्षांकडून कृषी कायदा रद्द करण्याचे राष्ट्रपतींकडे साकडे

विरोधी पक्षांकडून कृषी कायदा रद्द करण्याचे राष्ट्रपतींकडे साकडे

नवी दिल्लीः कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतीरामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासह भाकपचे सरचिटणीस डी. राजा आणि द्रमुकचे नेते टीकेएस एलांगोवन या प्रमुख पाच नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी एकत्रितपणे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली.

मागील पंधरा दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास देशभरातील शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. सरकारकडून केवळ चर्चाच्या फेऱ्या सुरू आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन कायद्याबाबत शेतकऱ्यांचे सरकाने म्हणणे एकून घ्यावे. तसेच हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, शेतकऱ्यांनी देशाचा पाया रचला आहे. रात्रंदिवस ते श्रम करतात. केंद्राचे नवी कृषी कायदे शेतकर्‍यांच्या हिताचे नाहीत. तिन्ही विधेयके संसदेशी चर्चा न करताच मंजूर झाली आहे, असं कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. शेतकऱ्यांच्या शक्तिसमोर कोणी टीकू शकत नाही. देशाचा शेतकरी भिणार नाही आणि मागे हटणार नाही. कायदे रद्द होईपर्यंत ठाम मांडून लढत राहणार, असं राहुल गांधी म्हणाले.

‘थंडीच्या दिवसांत शेतकरी रस्त्यावर आहेत. अगदी शांतपणे ते आपली नाराजी सरकारसमोर मांडत आहेत. हा प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य आहे’ असं म्हणत शरद पवार यांनी सरकारला आपल्या कर्तव्याची आठवण करून दिली.

आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिलं आहे. आम्ही कृषी कायदे रद्द करणं आणि वीज सुधारणा विधेयक रद्दबातल करण्याची मागणी आम्ही केलीय. हे कायदे लोकशाही पद्धतीने मंजूर झालेले नाहीत, असं सीपीएम नेते सीताराम येचुरी म्हणाले.

COMMENTS