उस्मानाबादमध्ये मंत्रिपद गेले, विकासही गायब !

उस्मानाबादमध्ये मंत्रिपद गेले, विकासही गायब !

उस्मानाबाद – 2019 या वर्षात झालेली विधानसभेची निवडणूक जिल्ह्याच्या विकासाला दूर घेऊन जाणारी ठरली आहे. राणा पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला तो जिल्ह्याचा विकास व्हावा यादृष्टीने. परंतु ते भाजपमध्ये गेले आणि भाजपची सत्ता गेली. जिल्ह्याला दुसरे एक नेतृत्व लाभले ते प्रा. तानाजी सावंत यांचे. गेल्या पाच वर्षात प्राध्यापक सावंत यांची घोडदोड सर्वांनी पहिली आहे. राजकारणात त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे. मागील पाच वर्षे शिवसेना सत्तेत होती. जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून तीन नेते होऊन गेले. मात्र त्यांच्याकडून जिल्ह्याला अपेक्षित विकासाची दिशा मिळाली नाही. मात्र सावंत यांनी 6 ते 7 महिन्यात जिल्ह्याला विकासाची दिशा देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याचा विकास हा, जिल्ह्याला निधी खेचून आणण्याच्या क्षमतेवरून ठरविला जातो.

जिल्ह्यात उद्योग, कारखाने वाढले, यावरही विकासाचा आलेख ठरतो. यातूनच पुढे विकासाची दिशा ठरते. सध्या जिल्ह्यात कृष्णा खोर्याचे पाणी, जिल्हा बँकेला मदत, उद्योग, बंद कारखाने सुरू करणे, असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. मात्र जिल्ह्याला मंत्रीपद नसल्याने हे प्रश्न सुटणे अवघड आहे. राष्ट्रवादी असो अथवा राहुल मोटे असो. किंवा भाजप या तिघांनाही प्राध्यापक सावंत नको होते. राजकीय आखाड्यावर ही बाब या तिघांच्या पारड्यात पडली असली तरी एकूणच जिल्ह्याच्या विकासासाठी मात्र ती मारक ठरनार आहे. कृष्णेचे पाणी जिल्ह्याला मिळावे यासाठी निधिसह पाण्याची मागणी अनेक आमदार सभागृहात करतील. पण जेव्हा, स्वतः मंत्री असाल तेव्हा फरकच पडतो. शिवसेनेच्या अनेक पालकमंत्र्यांनी गेल्या 5 वर्षात केवळ वसुलीमंत्री अशी भूमिका बजावली. अर्थात मिळकत झाल्याशिवाय राजकारण करता येत नाही, असेच पालकमंत्री जिल्ह्याला लाभले.

शिवाय अनेकजण मिळकत करण्यासाठीच राजकारणात येतात. मात्र सावंत यांना राजकारणातून पैसा मिळवणं हा हेतू मुळीच नाही. अनेक प्रसंगी त्यांनी स्वतःच्या आर्थिक क्षमतेतून विविध कामांना प्राधान्य दिले आहे. ते आर्थिक सक्षम आहेत. त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने अनेकांना आनंद झाला. यामध्ये प्रशासकीय सेवेत असलेल्या खाबुराव यांना पराकोटीचा आनंद झालाच. तर विरोधकांनाही उकळ्या फुटल्या. राजकीय आखाड्यात सावांताच्या विरोधकाना हे जरी योग्य असलं तरी पक्षातूनही त्यांच्या समर्थनार्थ कुणी आवाज उठवला नाही. किंबहुना त्यांना मंत्रिपद मिळावे अशी मागणी केली नाही. विशेषता खासदार समर्थकांनीही याबाबत शब्द काढलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्राध्यापक सावंत हे स्पष्टवक्ते आहेत. दुसऱ्या बाजूने त्यांना फटकळ म्हणून संबोधले जाते. त्यामुळे पक्षातील अनेकजण दबावाखाली असायचे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधकही सुंतीवाचून खोकला गेल्याची भावना व्यक्त करतात. कधीकधी प्रा. सावंतांच्या या गुणाचा पक्षालाही तोटा झाल्याने त्याची किंमत त्यांना मोजावी लागली असल्याचे बोलले जात आहे. हे जरी खरं असलं तरी त्यांचे मंत्रीपद गेल्याने जिल्ह्याचा विकास ही दुरावला असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

COMMENTS