उस्मानाबाद – भाजप उमेदवाराला मतदान करणं भोवलं, शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्यांना नोटीस!

उस्मानाबाद – भाजप उमेदवाराला मतदान करणं भोवलं, शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्यांना नोटीस!

उस्मानाबाद – जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीमध्ये 7 सदस्यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने शिवसेना पक्षाकडून नोटीस देण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नुकतीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवडणूक झाली. यामध्ये शिवसेनेच्या नऊपैकी सात सदस्यांनी अधिकृत उमेदवाराच्या ऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदावर शिवसेनेला पाणी सोडावं लागलं. शिवाय जिल्हा परिषदही ताब्यातून गेली. दरम्यान हे सातही सदस्य उपनेते प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या गटाला मानणारे आहेत. त्यामुळे पक्षाकडून आता या सात सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जर या सात सदस्यांवर कारवाई झाली तर पुढे आमदार प्राध्यापक तानाजी सावंत यांच्यावरही कारवाई होणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

COMMENTS