भाजपाने जर मला गाय दान केली तर… – असदुद्दीन ओवेसी

भाजपाने जर मला गाय दान केली तर… – असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली – भाजपाने तेलंगण निवडणुका समोर ठेवून एक लाख गायी दान करण्याचा संकल्प केला आहे.  त्यामुळे भाजपा मला गाय दान करेल का?  असा सवाल एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. तसेच भाजपाने जर मला गाय दान केली तर मी त्या गायीचा आदरपूर्वक सांभाळ करेन. पण प्रश्न हा आहे का भाजपा मला गाय दान देईल का? असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपला काँग्रेसमुक्त भारत नाही तर मुस्लिममुक्त भारत करायचा असल्याची टीकाही ओवेसी यांनी केली आहे. तसेच अमित शाह यांच्या आडनावावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. भाजपा शहरांची आणि गावांची नावं बदलत सुटली आहे. मग अमित शाह यांचं आडनाव पारशी आहे. ते आडनाव बदलतील का? असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.

 

COMMENTS