पालघर निवडणुकीत आघाडीला धक्का, भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध !

पालघर निवडणुकीत आघाडीला धक्का, भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध !

ठाणे – पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजपनं बाजी मारली असून भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी छाणणीत आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे भाजपच्या अलका राजपूत आणि गीता पिंपळे-संखे या दोघींची बिनविरोध निवड झाली आहे. या

पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी २४ मार्चला मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवट दिवस होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना गर्दी झाली होती. आज उमेदवार अर्जाची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आघाडीच्या दोन उमेदवारांचे अर्ज बाद झालेत. त्याचा फायदा भाजपला झाला आहे.

दरम्यान पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली आहे. भाजपच्या वाट्याला नऊ जागा आहेत. तर या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी या तीन पक्षात आघाडी झाली असून जागावाटप निश्चित झाले आहे.परंतु निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर आज दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे आघाडीला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS