पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खा. प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठं यश !

पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खा. प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठं यश !

बीड – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठं यश आलं आहे. या दोघींनी केलेल्या प्रयत्नांमुळे अंबाजोगाई येथील स्वा. रा. तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयास राज्य शासनाने सहा कोटी ६५ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. गोवा पॅटर्नच्या धर्तीवर  रूग्णालयात अत्याधुनिक शवविच्छेदन  गृहाच्या श्रेणीवर्धन अंतर्गत इमारतीचे बांधकाम या निधीतून होणार आहे.

शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने काल या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाचे श्रेणीवर्धन अंतर्गत बांधकाम करण्यात येणा-या इमारतीच्या स्थापत्य व विद्युतीकरणाच्या कामाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात दाखल करण्यात आले होते. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाशी  बोलून ही मान्यता मिळवून दिली. या कामासाठी सहा कोटी ६५ लाख ४६ हजार इतका निधी आता उपलब्ध झाला आहे.

 

गोवा पॅटर्नच्या धर्तीवर शवविच्छेदन गृह

अंबाजोगाई येथे गोवा पॅटर्नच्या धर्तीवर होणारे हे अत्याधुनिक शवविच्छेदन गृह ठरणार आहे. दोन मजली सर्व आधुनिक सोई सुविधांचा समावेश असलेल्या या शवविच्छेदनगृहात चोवीस तास पोस्टमाॅर्टेम सुविधा व उच्च दर्जाचे कोल्ड स्टोरेज यांचा समावेश असणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी दिली.

COMMENTS