“ओबीसी असल्यानं भाजपात पंकजा मुंडेंचं खच्चीकरण, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा! “

“ओबीसी असल्यानं भाजपात पंकजा मुंडेंचं खच्चीकरण, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा! “

मुंबई – भाजपाचे माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पंकजा मुंडे यांचं भाजपात खच्चीकरण केलं जात असल्याचा दावा केला आहे.भाजपानं कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केला आहे. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षातून काढून टाकण्याचा ठरावही भाजपाने केला होता. मात्र, त्याला विरोध केल्यानं तो ठराव फेटाळण्यात आला. तोच प्रकाश पंकजा मुंडे यांच्यासोबत केला जात आहे. ओबीसी असल्यानं त्यांचही खच्चीकरण केलं जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा सल्लाही शेंडगे यांनी दिला आहे.

दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवरून राजकीय वर्तुळ ढवळून निघाले. त्यानंतर स्वतः पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना आपण एकनिष्ठ असून, पक्ष सोडणार नाही. जे काही बोलायचे ते 12 डिसेंबरला बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे त्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेवा पूर्णविराम मिळाला होता. परंतु धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

COMMENTS