परळीत पंकजा मुंडेंची ताकद वाढली, ‘या’ नेत्यांनी दिला बिनशर्त पाठिंबा !

परळीत पंकजा मुंडेंची ताकद वाढली, ‘या’ नेत्यांनी दिला बिनशर्त पाठिंबा !

बीड, परळी – मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्रातील स्मारक यासह मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी भाजपा सरकारने सोडवले आणि यासाठी पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केल्याबद्दल संभाजी सेनेने बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्यासह भाजपा महायुतीला पाठिंबा दिला आहे, तसे पत्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर माने यांनी सुपूर्द केले आहे. परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी संभाजी सेनेचे कार्यकर्ते जीवाचे रान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय भाजप सरकारने सोडवला, यासाठी पंकजा मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्याचबरोबर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता, निवास व भोजनाची सोय, कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी असे समाजाचे सर्व प्रश्न मार्गी सरकारने मार्गी लावून न्याय दिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा समाजाचा फक्त निवडणुकीपुरता वापर केला आणि समाजाला देशोधडीला लावण्याचे पाप केले. मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी पंकजा मुंडे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणून परळीत यशश्री निवासस्थानी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे निवेदन दिले असल्याचे सुधाकर माने यांनी म्हटलं आहे.

या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी संभाजी सेनेचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील असा शब्द यावेळी देण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर माने, प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, प्रदेश संघटक सखाराम काळे पाटील, मुख्य सल्लागार प्रा. के. पी. कनके, मराठवाडा अध्यक्ष कृष्णा देशमुख, बीड जिल्हाध्यक्ष भरत वालेकर, श्रीराम नाईकवाडे आदींसह महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

PAGES

1 2

COMMENTS