पंकजा मुंडेंनी घेतले पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे दर्शन, ठिकठिकाणी केली श्रींची आरती !

पंकजा मुंडेंनी घेतले पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे दर्शन, ठिकठिकाणी केली श्रींची आरती !

पुणे – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज शहरातील मानाच्या पाच गणपतीसह विविध गणेशांचे दर्शन घेतले आहे. ठिक ठिकाणी त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. गणेश मंडळाच्या वतीने यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आल्याचं पहावयास मिळाले.

पुण्यातील गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. गणेशाच्या भव्य दिव्य मुर्तींचे तसेच देखाव्यांचे याठिकाणी आकर्षण असते. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे ना. पंकजाताई मुंडे यांनी आजच्या पुणे दौ-यात दुपारी मानाच्या पांच गणपतीपैकी पहिल्या कसबा पेठेतील गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम मंडळ, तुळशीबाग, केसरीवाडा, मंडई,  दगडूसेठ हलवाई, वस्ताद शेकचंद नाईक तालीम मंडळ आदी गणेश मंडळांना भेटी देवून श्रींची आरती केली. तत्पूर्वी सकाळी ढोले पाटील रोडवरील तरूण विकास मंडळाच्या गणेशाची आरती त्यांच्या हस्ते झाली. डॉ. अमित पालवे, प्रभाकरराव पालवे, आ. माधुरीताई मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, उमा खापरे, पुणे प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अशोक मुंडे, कमलताई ढोले पाटील व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान पंकजा मुंडे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत झाले. केसरीवाडा येथे महापौर बंगल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जयघोषात स्वागत केले. महापौर मुक्ता टिळक यांनी त्यांचा यावेळी सत्कार केला.

COMMENTS