आधी बैठकीला गैरहजेरी नंतर पंकजा मुंडेंनी केलं हे ट्वीट!

आधी बैठकीला गैरहजेरी नंतर पंकजा मुंडेंनी केलं हे ट्वीट!

मुंबई – भाजपची मराठवाडा विभागीय बैठक काल औरंगाबाद येथे पार पडली. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गैरहजेरी लावली. आजारी असल्यामुळे प,कजा मुंडे बैठकीला उपस्थित राहिल्या नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. परंतु गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांमुळेच त्या गैरहजर राहिल्याचं बोललं जात होतं.

त्यानंतर रात्री बारा वाजून सात मिनिटांनी ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी येत्या बारा तारखेला गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे. ’12 डिसेंबर ‘ रोजी सकाळी 11 वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना ‘गोपीनाथ गड’ येथे आमंत्रण. तुम्ही सारे या.. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे आहे. तुम्ही ही या.. वाट पहाते’ असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी केलेल्या ट्वीटमुळे त्या पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी बैठकीला गैरहजेरी लावली असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे 12 तारखेला काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS