आदित्य ठाकरेंनंतर पार्थ पवार विद्यार्थी राजकारणात सक्रिय !

आदित्य ठाकरेंनंतर पार्थ पवार विद्यार्थी राजकारणात सक्रिय !

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारही विद्यार्थी राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहे. पार्थ पवारांनी आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठातील अनेक समस्यांसदर्भात पार्थ पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्यपाल सी विद्यासागरराव यांना निवेदनही दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनंतर आता पार्थ पवारही विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले असल्याचं दिसत आहे.

दरम्यान पार्थ पवार हे आगामी लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघामधून लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यातच त्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे पार्थ यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा सुरु आहे.

COMMENTS