नरेंद्र मोदींची थेट हिटलरशी तुलना

नरेंद्र मोदींची थेट हिटलरशी तुलना

ठाणे – गुजरात क्रिकेट असोसिएशने अहमदाबादमध्ये तयार झालेल्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला सरदार पटेल यांचे नाव काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला. तसेच, मोदींची थेट हिटलरसोबत तुलना केली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादेतील मोटेरा स्टेडियममध्ये कसोटी सामना होत आहे. या स्टेडियमची नव्याने बांधणी झाल्यानंतर संपूर्ण परिसराचे नाव सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्पलेक्स करण्यात आले होते. पण, आता या क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलत नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले…हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते,’ असा हल्लोबल त्यांनी केला.

COMMENTS