पंतप्रधान मोदींचा मास्टरस्ट्रोक, थेट लडाखच्या सीमेवर!

पंतप्रधान मोदींचा मास्टरस्ट्रोक, थेट लडाखच्या सीमेवर!

श्रीनगर –  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अचानक लेह लडाखच्या दौऱ्यावर गेले आहेत. चीनसोबत झालेल्या संघर्षानंतर पहिल्यांदाच त लेहमध्ये दाखल झाले आहेत. भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष वाढला आहे. LAc वरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान थेट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पोहोचल्याने, भारताची आक्रमक भूमिका यावरुन दिसून येत आहे. यावेळी ते गलवान येथे जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत. मोदींसोबत मुख्य संरक्षण सचिव CDS बिपीन रावत हे देखील लेह दौऱ्यावर आहेत.

दरम्यान LAC वरील सैन्य माघारीदरम्यान, विश्वासघाती चीनने 15 आणि 16 जूनच्या रात्री केलेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे भारतात चीनविरोधात संतापाची लाट आहे. भारताने चीनसोबत आर्थिक व्यवहार हळूहळू नाकेबंदी कमी करण्याची तयारी केली आहे. त्याआधी भारताने चीनचे 59 अॅप्स बंद करुन झटका दिला आहे. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी थेट लेह लडाखच्या दौऱ्यावर गेले असल्यामुळे चीनला आणखी एक धक्का देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

COMMENTS