पंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार, भाजप नेत्यानं केला दावा !

पंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार, भाजप नेत्यानं केला दावा !

भोपाळ  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक मध्य प्रदेशातील गुना या लोकसभा मतदारसंघातून लढवणार असल्याचा दावा भाजपचे राज्यसभा खासदार आणि उपाध्यक्ष प्रभात झा यांनी केला आहे. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे पंतप्रधान मोदी हे गुनामधून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान 2014च्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि बडोदा या दोन ठिकाणावरून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी विजय मिळवल्यानंतर मोदींनी बडोदाची जागा सोडली होती. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ सोडून दुस-याच मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे.

या मतदारसंघात काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. मागील निवडणुकीत मोदी लाट असतानाही ते निवडून आले होते. त्यामुळे या मतदारसंघात मोदींनी स्वतः निवडणूक लढवली तर ज्योतिरादित्य शिंदे विरुद्ध नरेंद्र मोदी असा सामना पहायला मिळणार आहे.

तसेच केवळ कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी प्रभात झा यांनी हे विधान केलं असल्याचीही चर्चा आहे.

 

COMMENTS