काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का ? – नरेंद्र मोदी

काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का ? – नरेंद्र मोदी

उत्तर प्रदेश – काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का ? कि, मुस्लिम महिलांचाही आहे ? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना विचारला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर देताना ते देशवासियांबरोबर खोट बोलत असल्याचा आरोप केला. उत्तर प्रदेश आझमगड येथील सभेत ते बोलत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. विरोधक संसदेचे कामकाज बंद पाडण्याबरोबर ट्रिपल तलाकसारख्या महत्वाची विधेयकांचा मार्गही रोखून धरतात असल्याला आरोप यावेळी मोदींनी केला.

दरम्यान ट्रिपल तलाकच्या मुद्यावर काँग्रेसची जी भूमिका होती त्यातून त्यांचा खरा चेहरा उघड झाला असल्याची जोरदार टीका यावेळी मोदींनी केली. केंद्र सरकार महिलांचे आयुष्यात सुखकर बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि अन्य पक्ष एकत्र येऊन महिलांचे खासकरुन मुस्लिम महिलांचे जीवन खडतर बनवत आहेत. त्यामुळे काँग्रेस फक्त मुस्लिम पुरषांचा पक्ष आहे का असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला आहे.

 

 

COMMENTS