पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘त्या’ मंत्र्यांवर भडकले !

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘त्या’ मंत्र्यांवर भडकले !

नवी दिल्ली – आज दिल्लीत भाजपाच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीला काही म्त्र्यांनी दांडी ममारली. त्यामुळे या मंत्र्यांवर पंतप्रधान मोदी भडकले असून संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना संध्याकाळपर्यंत गैरहजर मंत्र्यांच्या नावाची यादी देण्यास सांगितलं आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासहित अनेक नेते उपस्थित होते.

दरम्यान या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना संबोधीत केले. खासदारांनी फक्त राजकारणाशी संबंधित राहता कामा नये. त्यांना राजकरणाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्येही सहभागी झालं पाहिजे. देशासमोर पाण्याचं मोठं संकट आहे. त्यासाठीही खासदारांनी काम केलं पाहिजे. आपल्या परिसरातील अधिकाऱ्यांसोबत बैठक करुन जनतेच्या समस्यांवर चर्चा केली गेली पाहिजे. खासदार आणि मंत्र्यांनी संसेदत उपस्थित असणं गरजेचं आहे. जे मंत्री उपस्थित असणं अपेक्षित असतानाही गैरहजर असतील त्यांची नावं त्याच संध्याकाळी मला दिली जावीत असा आदेश यावेळी नरेंद्र मोदींनी दिला आहे.

COMMENTS