…तशी अवस्था काँग्रेस-राष्ट्रवादीची झालीय, नांदेडमधील सभेत पंतप्रधान मोदींची जोरदार टीका !

…तशी अवस्था काँग्रेस-राष्ट्रवादीची झालीय, नांदेडमधील सभेत पंतप्रधान मोदींची जोरदार टीका !

नांदेड – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये आज जाहीर सभा पार पडली. या सभेत मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. मागील पाच वर्षात या दोन्ही पक्षांविरोधातला जनतेचा रोष कायम असल्याचंं मोदींनी म्हटलं आहे. यावेळी मोदी यांनी गुढीपाडव्याच्या मराठीत शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था अत्यंत कमकुवत झाली आहे. त्यांच्याकडे आमच्याविरोधात बोलण्यासाठी काही मुद्दे उरलेले नाहीत. त्यामुळे ते घाबरले आहेत. त्यांची अवस्था टायटॅनिक जहजासारखी झाली आहे. ते जहाज जसं बुडत असताना काही लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते तशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झाली असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस पक्ष फुटीरतावाद्यांच्या बाजूने असून आदर्श घोटाळा कुणी केला हे तुम्ही विसरलात का?, तसेच सोशल मीडियावर काँग्रेसवर कशी टीका होते आहे ते तुम्ही पहात आहात का? असाही प्रश्न नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे.

COMMENTS