देवेंद्र अजब तुझे सरकार !, आंदोलन केले म्हणून जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार!

देवेंद्र अजब तुझे सरकार !, आंदोलन केले म्हणून जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार!

सांगली – सांगलीतील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकणे महागात पडले असल्याचं दिसत आहे. कारण स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडेसह वाळवा तालुका अध्यक्ष भगवान जाधव यांना दोन वर्षांसाठी सांगली जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांची नोटीस मिळताच खळबळ उडाली असून वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच फडणवीस सरकारच्या या कारवाईवर देवेंद्र अजब तुझे सरकार! असं म्हणत अनेक जण सराकरचा निषेध करत आहेत.

दरम्यान राज्यातील भाजप सरकार सूडबुद्धीने वागत आहे. शेतकऱ्यांची चळवळ मोडीत काढण्याचे षडयंत्र सरकार करत आहे. आंदोलने मोर्चे करणाऱ्यांना हद्दपारीच्या नोटिसा पोलिसांच्यामार्फत दिल्या जात आहेत.
या षडयंत्राचा एक भाग म्हणून मला दोन वर्षासाठी चार जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत सांगली पोलिसांनी नोटीस दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकून ठेवायचं त्यांना काढायचं हा उद्योग भाजप सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.

लोकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलने मोर्चे काढू नये यासाठी हद्दपारीच्या नोटिसा काढून भाजप सरकार हुकूमशाही करत आहे. मात्र मी या हुकूमशाहीला दाद देणार नाही. आम्ही याविरोधात न्याय मागू रस्त्यावर उतरू असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS