आघाडीत सामील होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवली ‘ही’ मोठी अट!

आघाडीत सामील होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवली ‘ही’ मोठी अट!

नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत वंचित बहूजन आघाडीला घेण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. वंचित आघाडी आमच्यासोबत येण्यास तयार आहे असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला होता. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसपुढे मोठी अट ठेवली आहे. काँग्रेससोबत जर राष्ट्रवादी नसेल तरच आम्ही आघाडी करु. म्हणजेच जर काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली तर वंचित आघाडी या आघाडीत सहभागी होणार नाही. केवळ काँग्रेससोबतच आघाडी करण्याची तयारी प्रकाश आंबेडकरांनी दर्शवली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या अटीमुळे काँगरेस राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

दरम्यान काँग्रेससोबत आघाडी झाल्यास 50 टक्के जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असल्याची भूमिकाही वंचितने घेतली आहे.प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं होतं. आताही त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध कायम असून वंचितच्या या अटीमुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा पक्ष समावेश होण्याची चिन्हं कठीण दिसत आहेत.

COMMENTS