प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेसला ‘एवढ्या’ जागांचं खुलं आव्हान, जाहीरनाम्यातही घेणार ‘हा’ कळीचा मुद्दा!

प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेसला ‘एवढ्या’ जागांचं खुलं आव्हान, जाहीरनाम्यातही घेणार ‘हा’ कळीचा मुद्दा!

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला खुलं आव्हान दिलं आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत आमची 288 जागा लढण्याची तयारी आहे. मात्र तुम्ही 144 जागांवर लढा, आम्ही 144 जागांवर लढतो असं खुलं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिलं आहे. यापूर्वी आंबेडकरांनी काँग्रेसला 44 जागा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे आता यावर काँग्रेस काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहूजन आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यात सर्वात कळीचा मुद्दा घेणार आहे. तो म्हणजे राज्यातील पोलिसांची दिवसाची डयुटी वंचित बहुजन आघाडी सरकार आठ तासाची करणार आणि भत्ता कामगार असलेल्या होमगार्डना पगारी कामगार म्हणून मान्यता दिली जाणार असल्याचं या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारत सरकारमध्ये कामगार मंत्री असतांना त्यांनी पोलिसांना केवळ आठ तासाची सेवा असली पाहिजे असा आटोकाट प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याना अपेक्षित असलेली आठ तासाची सेवा अनेक सरकारे लागू करू शकले नाहीत. वंचित बहुजन आघाडीने येत्या विधानसभा निवडणुकीतील जाहीरनामामध्ये सर्वात कळीचा मुद्दा घेतला आहे. तो म्हणजे, हे सरकार सत्तेत आल्यावर राज्यातील लाखो पोलिसांची दिवसाची सेवा फक्त आठ तासाची करण्यात येईल. जेणेकरून पोलीस दल तणाव मुक्त, भीती मुक्त होवून योग्य प्रकारे सेवा व सुरक्षा देतील. राज्यात जसे लाखोंच्या संख्येने पोलीस कर्मचारी काम करतात. त्यांच्या सोबतीने सुमारे 36000 होमगार्डस देखील कार्यरत आहेत. या होमगार्डसना दरमहा फक्त 2500 ते 3000 रुपये इतकेच मानधन राज्य शासनाकडून दिले जाते. एवढ्या कमी पैशात होमगार्डचे कुटुंब जीवन जगणे अशक्य आहे. यास्तव राज्यातील सर्व होमगार्डसना भत्ता कामगार ऐवजी पगारी सरकारी कामगार म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सरकार मान्यता देईल. तसा पगार देखील होमगार्डसना दिला जाईल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. समस्त जनता व होमगार्डस कर्मचारी त्यांचेही जगणे वंचित बहुजन आघाडी सरकार सुखी करेल. हे मुद्दे येत्या विधानसभा निवडणूकीत जाहिरनाम्यात घेतले जाईल.

COMMENTS