दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर कोणती जागा सोडणार?, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया !

दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर कोणती जागा सोडणार?, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया !

मुंबई – दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर कोणती जागा सोडणार? यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर आणि अकोला या दोन मतदारसंघात निवडणूक लढवली आहे. या दोन्ही जागांवर त्यांना काँग्रेस आणि भाजपचं तगडं आव्हान आहे. पण अशा परिस्थितीतही त्यांनी जर दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर ते कोणती जागा सोडणार? असं विचारलं असता स्मितहास्य करत आताच याबाबत आपण प्रतिक्रिया देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान देशाचा आगामी पंतप्रधान हा काँग्रेस किंवा भाजपचा नसेल. त्यामुळे राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच भाजपाला अंदाजे १५० ते २०० जागा मिळतील असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS