बारामतीतून सुप्रिया सुळेच जिंकणार  – प्रकाश आंबेडकर

बारामतीतून सुप्रिया सुळेच जिंकणार – प्रकाश आंबेडकर

पुणे – वंचित बहुजन विकास आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सडकून टीका केली आहे. देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची पातळी लक्षात घेता मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार नाही. तसेच देवेगौडांसारखी एखादी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते. असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  बारामती संदर्भात शरद पवार यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरेल असे मला वाटत नाही. माझ्या मते सुप्रिया सुळे यांच बारामतीतून जिंकणार असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

तसेच मागील ५० वर्षात लोकांनी पाणी चोरून त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला आहे. तेच लोक आता दुष्काळावर बोलत आहेत. मी देखील दुष्काळासंदर्भात दौरे करत आहे. मात्र, सत्ताधारी किंवा ५० वर्षे सत्तेत असल्याप्रमाणे मी त्याचे मार्केटिंग करीत नाही. खरं म्हणजे हे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा प्रकार असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.  महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त पुण्यातील गंज पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते.

COMMENTS