खासदार शरद बनसोडे विरुद्ध आमदार प्रणिती शिंदे, वाद पेटला !

खासदार शरद बनसोडे विरुद्ध आमदार प्रणिती शिंदे, वाद पेटला !

सोलापूर – खासदार शरद बनसोडे आणि काँग्रेसच्या  आमदार प्रणिती शिंदे असा वाद पेटला असल्याचं दिसत आहे. शरद बनसोडे यांच्याविरोधात काँग्रेसनं निदर्शनं केली आहेत. आपण यांना पाहिलत का? आपण यांना ओळखता का? असे फलक दाखवण्यात येत आहेत. काँग्रेस पक्ष आणि युवक काँग्रेसने हुतात्मा पुतळ्यासमोर ही  निदर्शने केली.

दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना प्रणिती शिंदे यांनी खासदार बनसोडे यांचा उल्लेख ‘बेवडा’ असा केला होता. त्यानंतर बनसोडे यांनी प्रणिती शिंदेंवर पलटवार केला. वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही तर तुमचं सोलापुरात फिरणंच बंद होईल  असं शरद बनसोडे यांनी प्रणिती शिंदे यांना म्हटलं होतं. त्यानंतर बनसोडे यांच्याविरोधात आज काँग्रेसनं निदर्शनं केली आहेत. त्यामुळे खासदार शरद बनसोडे आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यातील वाद आता पेटला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS