प्रियांका गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार ?

प्रियांका गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार ?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असल्यामुळे सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार सुरु केली आहे. लोकसभेसाठी काँग्रेसकडूनही जोरदार हालचाली सुरु असून 2019 ची लोकसभा निवडणूक सोनिया गांधींऐवजी प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. तसेच याबाबत सोनिया गांधींसोबत चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

दरम्यान रायबरेली हा काँग्रेसचा पारंपारिक मतदासंघ असून सध्या या मतदारसंघातील खासदार सोनिया गांधी आहेत. तसेच आगामी निवडणूक सोनिया गांधी या लढवणार नसल्यामुळे या मतदारसंघाची उमेदवारी प्रियांका गांधी यांनाच दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच प्रियांका गांधी देखील या मतदारसंघात परिचीत असून त्यांनी यापूर्वी अनेकवेळा काँग्रेसचा प्रचार याठिकाणाहून केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हालचालींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS