पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार, आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन !

पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार, आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन !

पुणे – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन पिंपरी-चिंचवडमध्ये आज मराठा बांधवांनी अनोखं आंदोलन केलं. शहरातील तीन खासदार, तीन आमदारांच्या घरासमोर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यानी ठिय्या मांडून घंटानाद आंदोलन केलं आहे. तसेच या आंदोलनावेळी कार्यकर्त्यानी आमदार, खासदार जागे व्हा अशा घोषणा दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमधील राज्यसभेचे खासदार अमर साबळे, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजी आढळराव-पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले.

दरम्या या आंदोलकांनी आमदार महेश लांडगे यांच्या घरासमोर शेवटचे आंदोलन केले तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरासमोर आंदोलन सुरू असताना ते बाहेर आले. यावेळी जगताप यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटत असेल तर आम्ही राजीनामे देऊ असं जगताप यांनी आंदोलकांना म्हटलं.

 

COMMENTS