पुणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजपकडून यांची नावं जाहीर !

पुणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजपकडून यांची नावं जाहीर !

पुणे – पुणे महापालिकेतील महापौरपद एका वर्षांसाठी असणार असून महापौरपदासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर उपमहापौर पदासाठी सरस्वती शेडगे यांचे नावे जाहीर करण्यात आली आहेत. या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले असून शिवसेना निवडणुकीपासून दूर राहिली असल्याचं दिसत आहे. अर्ज दाखल करताना कुणाचीच उपस्थिती नसल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान महापालिकेत एकूण 162 नगरसेवक असून भाजपचे 99 नगरसेवक आहेत. यात आरपीआयचे 5 नगरसेवक आहेत.
त्यासाठी आरपीयआयनं उपमहापौरपदासाठी दावा केला होता. परंतु उपमहापौरपद न दिल्याबद्दल पक्षाच्या नगरसेवकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. तसेच याठिकाणी राष्ट्रवादी 42
काँग्रेस 10, शिवसेना 10, एमआयएम 1 अशी नगरसेवकांची संख्या आहे. राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी प्रकाश कदम यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र बहुमत लक्षात घेता महापौर-उपमहापौर पद भाजपलाच मिळणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS