शिवाजीनगर-हिंजवडीदरम्यान लवकरच धावणार मेट्रो !

शिवाजीनगर-हिंजवडीदरम्यान लवकरच धावणार मेट्रो !

पुणे – शिवाजीनगर, हिंजवडी मेट्रोला अखेर मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. शिवाजीनगर, गणेशखिंड, औंध, बाणेर, बालेवाडी, वाकड मार्गावरुन हिंजवडी पर्यंत ही मेट्रो धावणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी असा प्रवास दररोज लाखो नागरिक करत असतात. त्यामुळे या मेट्रोचा फायदा जवळपास २ लाख लोकांना होणार आहे.

 

 

सरकारकडून मेट्रोच्या 26 किमी मार्गाला मंजुरी देण्यात आली असल्याची घोषणा गिरीश बापट यांनी केली आहे. मेट्रोच्या या कामासाठी 8 हजार 300 कोटींचा निधी लागणार असून ११०० कोटी केंद्र सरकार देणार आहे तर इतर निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. या मार्गावर २६ स्टेशन असणार आहेत तर 48 महिन्यात काम पूर्ण केलं जाणार असल्याचं बापट यांनी म्हटलं आहे. गेली अनेक दिवसांपासून शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो सुरु करण्याची मागणी पुणेकरांची होती. राज्य सरकारच्या या घोषणमुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS