लोकसभेत पक्ष विरोधी काम केल्याने शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी!

लोकसभेत पक्ष विरोधी काम केल्याने शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी!

जुन्नर, पुणे – जुन्नर तालुक्यातील शिवसेना नेत्या आशाताई बुचके यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आशाताई बुचके यांनी लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याने शिवसेना पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.आशाताई बुचके यांनी 2014 साली शिवसेनेकडून जुन्नर विधानसभेची निवडणूक लढवली होती. सध्या त्या पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आहेत. पक्षातून त्यांची हकालपट्टी केल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

COMMENTS