लवकरच राधाकृष्ण विखे-पाटील घेणार मोठा निर्णय ?

लवकरच राधाकृष्ण विखे-पाटील घेणार मोठा निर्णय ?

अहमदनगर – काँग्रेसचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटील लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. ते पंतप्रधान मोदींच्या शपथविधीनंतर काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. तसेच त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.मोदींच्या शपथविधीनंतर राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात विखेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान कालच काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी विखेंबाबत गौप्यस्फोट केला आहे. विखे जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे जाऊ, असं सत्तार म्हणाले आहेत. तसेच राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करताना काँग्रेसचे 10 ते 15 आमदार सोबत घेऊन जातील असा अंदाज राजकीय विश्लेषक लावत आहेत. शनिवारी लोणी येथे विखे समर्थक 13 आमदारांची गुप्त बैठक झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला विखे पाटील मोठा धक्का देतील असं दिसज आहे.

COMMENTS