“राहुल गांधी हिंदू आहेत की नाही माहीत नाही”, पण ….

“राहुल गांधी हिंदू आहेत की नाही माहीत नाही”, पण ….

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हिंदू आहेत की नाही माहीत नाही, पण त्यांनी हिंदू धर्माचे अनुकरण केल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करतो असं वक्तव्य विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव मिलिंद परांडे यांनी केलं आहे. ते लखनौमधील पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. भारतात प्रत्येकानेच हिंदू धर्माचे अनुकरण करायला हवे राहुल गांधी हे हिंदू आहेत की नाही याबद्दल माहिती नाही, पण जर ते हिंदू धर्माचे अनुकरण करत असतील तर त्यांचे स्वागतच असल्याचं परांडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राहुल गांधी यांनी नुकतीच मानसरोवर यात्रा केली आहे. त्यामुळे परांडे यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. तसेच मागच्या वर्षी 32 लाख जणांनी विहिंपमध्ये प्रवेश केला असून यापुढे  परिषदेत आता महिलांनाही स्थान दिले जाणार असल्याची माहिती परांडे यांनी यावेळी दिली आहे.

 

COMMENTS