राहुल गांधींनी सोडलं काँग्रेसचं अध्यक्षपद, काय म्हणालेत चार पानी पत्रात?

राहुल गांधींनी सोडलं काँग्रेसचं अध्यक्षपद, काय म्हणालेत चार पानी पत्रात?

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक चार पानी पत्र ट्वीट केलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच राहुल गांधींनी ट्विटर हँडल बदललं असून ट्विटर हँडलवर केवळ काँग्रेस खासदार असा उल्लेख  केला आहे. त्यामुळे राहुल गांधी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं असल्याचं दिसत आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षपद हे खूपच जबाबदारीचं पद असल्याचं म्हटलं आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या पराभवाची जबाबदारी मी घेतो आहे. त्यामुळे मी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. दरम्यान नव्या अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत काँग्रेसचे वरिष्ठ नेता मोतीलाल वोरा हे अध्यक्ष म्हणून कारभार पाहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान या पत्रात राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपवर मला कसलाही राग नाही. परंतु त्यांच्यासोबत विचारधारेची लढाई आहे. विचारांची लढाई ही आपल्या देशात हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. पण सध्या आपल्या संविधानावर जो घाला घातला जातोय, ती देशाची रचना उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने वाटचाल आहे. पण मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. मी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक आहे आणि देश वाचवण्यासाठी हा संघर्ष चालूच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS