“राहुल गांधी हे निपा व्हायरसप्रमाणे,  जो पक्ष त्यांच्या संपर्कात येतो तो संपुष्टात येतो !”

“राहुल गांधी हे निपा व्हायरसप्रमाणे, जो पक्ष त्यांच्या संपर्कात येतो तो संपुष्टात येतो !”

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि निपा व्हायरस हे सारखेच असल्याचं वक्तव्य भाजपच्या नेत्यानं केलं आहे. हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना निपा व्हायरसशी केली आहे. राहुल गांधी हे निपा व्हायरसप्रमाणे आहेत. जो पक्ष त्यांच्या संपर्कात येतो तो संपुष्टात येत असंल्याची जोरदार टीका अनिल विज यांनी केली आहे. विज यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान विज यांनी याबाबतचं ट्वीट केलं असून राहुल गांधी हे निपा व्हायरस सारखे आहेत. त्यांच्या संपर्कात जो पक्ष येईल तो संपुष्टात येतो असा टोला त्यांनी लगावला होता. कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन आले आहे. त्या पार्श्वभूमीवर विज यांनी राहुल गांधींवर टीका केली असल्याचं दिसून येत आहे.

 निपा व्हायरस

 गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये निपा व्हायरसची साथ आल्याचे दिसून येत आहे. केरळमधील कोझिकोड येथे हे प्रकरण सर्वांत आधी समोर आले. आतापर्यंत तेथील १४ लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. वटवाघळांमुळे हा व्हायरस पसरतो असे सांगितले जाते.

COMMENTS