पंतप्रधान मोदींना हिंदूत्वाबद्दल काहीच माहीत नाही – राहुल गांधी

पंतप्रधान मोदींना हिंदूत्वाबद्दल काहीच माहीत नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी हे हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहीत नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. गीतेत काय म्हटले आहे हे सर्वांनाच माहित आहे. पण मोदींना हिंदुत्वाबद्दल माहिती नाही. ते नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत ?, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे. उदयपूरमधील व्यापारी वर्गासोबत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय सैन्याचा होता. परंतु मोदींनी त्याचे श्रेय घेऊन राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. खासगी शिक्षण संस्था चांगल्या असतात हा एक गैरसमज आहे. सरकारच्या मदतीशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात पुढे जाता येणार नाही.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात तीन वेळा सर्जिकल स्ट्राइक झाले होते. सैन्याचे अधिकारी ज्या वेळी मनमोहन सिंग यांच्याकडे गेले त्यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत गोपनीयता बाळगावी अशी विनंती केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.

 

COMMENTS