राहुल गांधींनी केलं चक्क अमित शहांचं अभिनंदन !

राहुल गांधींनी केलं चक्क अमित शहांचं अभिनंदन !

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन केले, असे बातमीचे शिर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना ! वाढदिवसच असेल तर शुभेच्छा दिल्या असत्या. पण चक्क अभिनंदन ! हो पण हे खरं आहे. मात्र हे अभिनंदन उपाहासात्मक केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन अमित शहा यांचे उपहासात्मक अभिनंदन केले आहे.

राहुल गांधी म्हणतात, अभिनंदन अमित शहा जी, संचालक, अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक, नोट बदली करुन देण्याच्या स्पर्धेत तुम्ही पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल अभिनंदन. तुमच्या बँकेने 5 दिवसात 750 कोटी रुपये एवढ्या रकमेच्या नोटा बदलून दिल्या आहेत. नोटबंदीमुळे कोट्यवधी भारतीयांचे हाल झाले असताना आपल्या या दैदिप्यमान यशाबद्दल खरोभरच तुमचे कौतुक करायला पाहिजे.

नोटबंदीच्या काळात सर्वाधिक पैसे बदलून देण्यामध्ये अहमदाबाद बँकेने पहिला क्रमांक पटकावला आहे. आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती उघड झाली आहे. अमित शहा हे अहमदाबाद बँकेचे संचालक आहेत. यावरुन अमित शहा यांच्यावर टीका होत आहे. नोटबंदीची माहिती अमित शहा यांच्या जवळच्या उद्योगपतींना होती असाही त्यांच्यावर आरोप आहे.

COMMENTS