राहुल गांधीं यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरला, राज्यातील 30  ज्येष्ठ नेते उमेदवारीसाठी सूचक !

राहुल गांधीं यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरला, राज्यातील 30  ज्येष्ठ नेते उमेदवारीसाठी सूचक !

मुंबई – काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खा. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जाला राज्यातल्या ३० ज्येष्ठ नेत्यांनी सूचक म्हणून स्वाक्ष-या करून उमेदवारी अर्ज  महाराष्ट्र प्रदेश निवडणूक आधिकारी माजी खा. डॉ. महेश जोशी यांच्याकडे सुपूर्द केले. राहुल गांधी यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, देशाचे माजी गृहमंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, रोहिदास पाटील, हर्षवर्धन पाटील, आ.नसीम खान, आ.बस्वराज पाटील, आ. सतेज पाटील, आ. निर्मला गावित, आ. यशोमती ठाकूर, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष माजी आ. एम. एम. शेख, प्रदेश पदाधिकारी नतिबोद्दीन खतीब,  रमेश कीर, यांनी स्वाक्ष-या केल्या.

प्रदेश निवडणूक अधिकारी माजी खा. डॉ. महेश जोशी आज सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे हे अर्ज सुपूर्द करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

COMMENTS