पंतप्रधानपदाच्या पसंतीमध्ये पहिल्यांदाच राहुल गांधीनी मोदींना मागे टाकले !

पंतप्रधानपदाच्या पसंतीमध्ये पहिल्यांदाच राहुल गांधीनी मोदींना मागे टाकले !

विधानसभा होणा-या राज्यातील सर्व्हेनंतर इंडिया टुडे आणि अक्सिस माय इंडिया या संस्थांनी दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये सर्व्हे केला आहे. यामध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. आजपर्यंत पंतप्रधान पदाच्या पसंतीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षा मोठ्या फरकाने पुढे असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पसंती पहिल्यांदाच घसरली आहे. आंध्र प्रदेशात राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा जास्त पसंती आहे. पंतप्रधानपदासाठी आंध्रच्या 44 टक्के मतदारांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शविला आहे. तर नरेंद्र मोदी यांना 38 टक्के मतदारांचा पाठिंबा आहे.

2014 नंतर कुठल्या राज्यात राहुल गांधी यांनी मोदींना पिछाडीवर टाकण्याची पहिलीच वेळ आहे. या संस्थेनं दक्षिण भारातील आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि कर्नाटक या राज्यात सर्व्हे केला आहे. यापैकी आंध्रप्रदेशात राहुल गांधींनी आघाडी घेतली आहे. तर तेलंगना आणि कर्नाटकात मोदींची आघाडी कायम आहे. मात्र अंतर कमी झालं आहे. कर्नाटकात 55 टक्के मतदारांनी नरेंद्र मोदींना तर 42 टक्के मतदारांनी राहुल गांधींना पाठिंबा दर्शविला आहे. तेलंगनामध्ये 44 टक्के मतदारांनी मोदींना पाठिंबा दर्शवला आहे. तर 39 टक्के मतदारांनी राहुल गांधींना पाठिंबा दर्शविला आहे.

आंध्रप्रदेशात विधानसभा निवडणुकीत मात्र तेलगू देशम पक्षाला फटका बसताना दिसतोय. पहिल्यांदाच तिथे वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन यांना मुख्यमंत्रीपदासाठी जास्त पाठिंबा मिळाला आहे. जगनमोहन यांना 39 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. तर 38 टक्के मतदारांनी विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पाठिंबा दर्शविला आहे. कर्नाटकातील नुकत्याच सत्तेवर आलेल्या आघाडीविषयी मतदारांमध्ये लगेच नाराजी पसरली आहे. तब्बल 35 टक्के मतदारांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. तेलंगाणामध्ये मात्र विद्यमान मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नावाला 48 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे.

COMMENTS