आज बाळासाहेब असायला पाहिजे  होते – राज ठाकरे

आज बाळासाहेब असायला पाहिजे होते – राज ठाकरे

पुणे – राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे. आज अतिशय आनंद झाला. इतक्या वर्षाची प्रतीक्षा होती ती आज संपली असून या संपूर्ण आंदोलनात, संघर्षात ज्या कारसेवकांनी बलिदान दिलं, ते कुठेतरी सार्थकी लागलं असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच राम मंदिर लवकरात लवकर बांधावं. त्याशिवाय देशात रामराज्यही आणावं, जेणेकरुन आज ज्या देशात नोकऱ्या जातायेत, इतर काही गोष्टी घडतायत, ते संपलं पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान आज बाळासाहेब असायला हवे होते, हा निर्णय ऐकायला ते हवे होते, त्यांना खूप आनंद झाला असता. सर्वोच्च न्यायालयाचं मी मनापासून आभार मानेन, अभिनंदन करेन, इतका धाडसी निर्णय घेतला असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

COMMENTS