लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय?, सर्वपक्षीय बैठकीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया !

लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय?, सर्वपक्षीय बैठकीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया !

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, रासपचे नेते महादेव जानकर, शेकापचे नेते जयंत पाटील, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई इत्यादी नेते उपस्थित होते.

दरम्यान यावेळी सर्व नेत्यांनी मास्क घातलेला असताना राज ठाकरे मात्र मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचले होते. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असताना राज ठाकरे यांनी मात्र मास्कशिवाय मंत्रालयात आल्याने चर्चा रंगली होती.

या सर्वपक्षीय बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी तसेच छोटे दवाखाने सुरु करावेत. परप्रांतीय मजूर जे बाहेर गेले आहेत, त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन महाराष्ट्रात घ्यावं तसेच
एमपीएसी विद्यार्थ्यांना घरी पोहोचवावं असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारचा लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय आहे? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं. लॉकडाऊन बंद केला, त्यामुळे संध्याकाळच्या फ्लाईटने कोरोना जाणार नाही. लस येईपर्यंत कोरोना जाऊ शकत नाही असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

COMMENTS