त्यामुळेच मी पंतप्रधान मोदींविरोधात प्रचार करतोय – राज ठाकरे

त्यामुळेच मी पंतप्रधान मोदींविरोधात प्रचार करतोय – राज ठाकरे

नांदेड – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नांदेड येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचार करतोय. याचं कारण एकच आहे ते म्हणजे माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा गळा केसाने कापला आहे. या जनतेने त्यांना भरभरून मतं दिली आता मात्र मोदींनी विश्वासघात केला त्याचमुळे मी त्यांच्या विरोधात प्रचार करतो असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून आणि युतीचं सरकार राज्यात आल्यापासून महाराष्ट्रात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आमच्या ग्रामीण महाराष्ट्रातला तरूण गाव सोडून जात आहे. हेच का अच्छे दिन? हेच का मोदींनी दाखवलेले स्वप्न? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

तसेच बालाकोटच्या वेळी आमच्या वैमानिकांना चुकीची माहिती दिली गेली, त्यानंतर अमित शाह म्हटले 250 दहशतवादी मारले गेले. अमित शाह यांना कसे काय कळलं? हवाई दलाच्या प्रमुखांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी सांगितले की नेमके किती लोक मारले गेले ते आम्हाला सांगता येणार नाही. जो मदरसा उद्ध्वस्त केल्याचा दावा केला जातो आहे तो मदरसा सुरक्षित असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे असेही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

COMMENTS